थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच
महापालिकेची धडक कारवाई सुरू
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या विविध प्रभागात थकबाकी पोटी अनेक मालमत्ता सील करण्याची कारवाई शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) करण्यात आली आहे. कल्याण क प्रभाग क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मालमत्ता कराची रक्कम थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना वारंवार नोटिसा दिल्या होत्या; मात्र तरीदेखील मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्याने महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे -कुलकर्णी, क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात व अधीक्षक बळवंत बजागे यांच्या पथकाने मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई दिवसभरात केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथील १८ गाळे सील करण्यात आले. अ प्रभागातील सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दोन लाख ९० हजार इतकी थकबाकी असल्याने १० सदनिका व चार दुकाने सील केली आहेत. ड प्रभागात सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी दोन लाख १९ हजार ३८० इतकी थकबाकी असल्याने युनियन बँकेचे एटीएम सील केले. जे प्रभाग येथील काटे मानिवली तिसगाव या भागातील मालमत्ता कराची ११ लाख ४५ हजार २४१ थकबाकी असल्याने मालमत्ता सील व नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई जे प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे व त्यांच्या पथकाने केली. तिसगाव, नेतिवली या परिसरात कारवाई केली. तसेच गणेशवाडी व कोळसेवाडी या भागातील नळजोडण्या खंडित केल्या. ग प्रभागात सहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या पथकाने गजानन कृपा चाळ, आयरे गाव येथील गाळा नंबर १ सील केला. तसेच आयरे गावातील साई सहारा चाळ येथील गाळा क्रमांक ११ व १२ सील केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.