मुंबई

चिमुकल्यांच्या वेशभूषेतून महापुरुषांचे दर्शन

CD

नेरूळ, ता. ३० (बातमीदार) : पारंपरिक नऊवारी साडी, नथ, ब्रँडेड गॉगल, रंगीबेरंगी फेटे परिधान करून दुचाकीवर स्वार झालेल्या महिलांचे पथक, संस्कार भारती रांगोळ्या आणि लहान मुलांनी केलेली महापुरुषांची वेशभूषा हे सर्व सांस्कृतिक चित्र बेलापुरातील नववर्ष शोभायात्रेनिमित्त नवी मुंबईकरांना अनुभवायला मिळाले. महिलांनी ढोल-ताशाच्या आवाजावर ताल धरून लेझीम खेळत या शोभायात्रेत भाग घेतला.
गुढीपाडव्यानिमित्त सीबीडी बेलापूर सेक्टर १५ येथील साई रेसिडेन्सीमध्ये नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ढोल-ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. लहान मुलांसाठी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व व थोर नेते या थीमनुसार फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये सर्वोत्कृष्ट पोषाखासाठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच पारंपरिक पोशाख परिधान करून या शोभायात्रेत सहभाग घेतला. शोभायात्रेची सुरुवात बेलापूर सेक्टर १५ येथील साई रेसिडेन्सीपासून झाली व समारोप सेक्टर १५ येथील मारुती पॅराडाइज येथे करण्यात आला. या शोभायात्रेचे आयोजन राधिका शिंदे, स्वप्नील कोलटकर, अजय ठाकूर, गायत्री दळवी, धनश्री शिंदे, जानवी शिंदे यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

Nagpur News:ऑरेंज सिटी बनत आहे ‘गॅस चेंबर’!; स्वच्छ हवेसाठी नागपूरकर झाले व्याकूळ!

SCROLL FOR NEXT