मुंबई

तुर्भे येथील श्रीरामतनु मंदिरात गुढीपूजन

CD

तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने रविवारी (ता. ३०) सकाळी श्री रामतनु मंदिर परिसरात गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. गुढी उभारल्यानंतर श्री रामतनु मंदिराकडून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लहान मुलांच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले होते. शोभायात्रा हनुमान मंदिराजवळ आल्यावर महिलांनी संगीताच्या तालावर फेरा धरला. शिस्तबद्ध पद्धतीने यात्रेची श्री रामतनु मंदिरात सांगता करण्यात आली. शोभायात्रा समाप्तीनंतर अखंड रामनाम गजर, रामरक्षा सहस्रवर्तने, तसेच शांता महिला मंडळाच्या वतीने हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम झाला. गुढीपाडव्याचा उत्सव साजरा करण्यासाठी सुजाता सामंत, लता पाटील, सारिका म्हात्रे, आशा म्हात्रे, कल्पना भोईर, रजनी पाटील, अनिता ठाकूर, मनीषा क्षीरसागर, सुरेखा पाटील व जयश्री पाटील आदी महिलांचा मोठा सहभाग होता. विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टचे अध्यक्ष मोहन सामंत व तुर्भे ग्रामदेवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अंबादास दानवेंसाठी काँग्रेसनं घेतली माघार; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देताना 'मविआ'मध्ये नक्की कोणती झाली 'डील'?

Artificial Mango Ripening : सावधान! तुम्ही खाल्लेला आंबा नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Latest Marathi News Live Update : भाजप सर्व राज्यांमध्ये विजयी होईल- स्वाती मालीवाल

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

SCROLL FOR NEXT