मुंबई

मालमत्ता कर भरा, सहकार्य करा

CD

पनवेल, ता. ३० (बातमीदार) : पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर भरण्याचा सोमवारी (ता. ३१) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी (ता. ३१) पालिकेच्या तिजोरीत या आर्थिक वर्षातील विक्रमी ४०५ कोटींचा भरणा झाला आहे.
मालमत्ता कर भरण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख असून, आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार मालमत्ता कर भरण्यासाठी रविवार व सोमवारी सुट्टीच्या दिवशीही नागरिकांसाठी कार्यालये खुली ठेवण्यात आली होती. पुढील वर्षाची दोन टक्के शास्ती वाचविण्यासाठी मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपूर्वी आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या १३ वसुली पथकांच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रात वसुली मोहीम सुरू आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये सुमारे ४४७ जप्तीपूर्वीच्या नोटिसा व २७ वॉरंट नोटिसांचे वाटप थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत सुमारे १४४ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या नेतृत्वाखाली कर अधीक्षक महेश गायकवाड व सुनील भोईर हे वसुली पथकाच्या माध्यमातून दररोज उच्चांकी वसुली करत आहेत. रविवारपर्यंत (ता. ३०) पालिकेने ४०५ कोटींचा उच्चांकी मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंतची ही सर्वाधिक वसुली आहे.
----------------
ॲप, ऑनलाइन पद्धतीने कर भरा
नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाइन पद्धतीने भरता यावा यासाठी महापालिकेने ‘सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड’ तयार केले आहे. ऑनलाइन कर भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www.panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------
२०२४-२५ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. पुढील वर्षाची दोन टक्के शास्ती वाचविण्यासाठी मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपूर्वी आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
- स्वरूप खारगे, उपायुक्त (कर), महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT