मुंबई

कल्याण स्थानकाचा पाणीपुरवठा खंडित

CD

कल्याण, ता. ३० (बातमीदार) : कल्याण रेल्वेस्थानकाकडून महापालिकेच्या पाणीपट्टीचे तब्बल चार कोटी ४१ लाख थकवण्यात आले हाेते. याप्रकरणी स्थानकाला महापालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठा १२ तासांहून अधिक काळासाठी खंडित करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने एक कोटीचा कर भरण्याची तयारी दाखवल्यावर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

कल्याण रेल्वेस्थानकासह रेल्वेच्या विविध आस्थापनांना मिळून कल्याण-डोंबिवली महापालिकेने ११ नळजोडण्या पुरवल्या आहेत. यात आंबिवली, टिटवाळा येथील रेल्वे आस्थापनांचाही समावेश आहे. या सर्व नळजोडण्यांचे पाणीदेयक गेल्या अनेक महिन्यांपासून थकले असून, त्याची रक्कम आठ कोटींहून अधिक असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये २३ मार्चला प्रसिद्ध केले होते, मात्र त्या वेळी रेल्वेने माेठी थकबाकी नसल्याचे स्पष्ट करत एप्रिलमध्ये रेल्वेकडून पाणीपट्टी भरणा केला जातो, असे स्पष्ट केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यावर महापालिका प्रशासनाने रेल्वेवर कारवाई केली. या कारवाईमुळे कल्याण रेल्वेस्थानकातील पाणीपुरवठा काही वेळेसाठी खंडित झाल्याने रेल्वेस्थानकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

रेल्वे प्रशासनाकडून नमते
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना स्पष्ट केले की, फक्त कल्याण रेल्वेस्थानक परिसरातीलच रेल्वेच्या आस्थापनांचे चार कोटी ४१ लाख थकवल्याबद्दल ही कारवाई आहे. शनिवारी (ता. २९) कल्याण रेल्वेस्थानकाला पाणीपुरवठा करणारे पाण्याचे दोन वॉल्व्ह बंद करण्यात आले, मात्र त्यानंतर मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी सरकारकडे पाठपुरावा करून एक कोटीचा कर भरण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच उर्वरित रक्कम भरण्याबाबत महापालिका आणि रेल्वे अधिकारी यांची बैठक पार पडल्यानंतर निर्णय होईल, मात्र लवकरच रेल्वेचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

कारला एसटी बस घासली, चालकाची सटकली; बस ड्रायव्हरसह महिला प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT