विरार, ता. ३० (बातमीदार) : विरारमध्ये शनिवारी (ता. २९) रात्री भररस्त्यात अचानक झाडाची मोठी फांदी तुटून पडली. या वेळी दुचाकीवरून जाणारा डिलिव्हरी बाॕय थोडक्यात बचावला. विरार पश्चिमेतील चाळपेट येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखा परिसरात अतुल वर्तक यांच्या घराजवळ ही घटना घडली. एका मोठ्या झाडाची फांदी रात्री १० वाजून २० मिनिटांच्या सुमारास अचानक तुटून रस्त्यावर पडली. याचवेळी एका ऑनलाइन कंपनीचा डिलिव्हरी बाॕय दुचाकीवरून जात होता. फांदी तुटून पडताना ती महावितरणच्या वायरला अडकून रस्त्यावर पडताना विजेच्या ठिणग्या पडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. त्यात दुचाकी घसरून चालक रस्त्यावर पडला. महावितरण आणि महापालिकेने वेळच्या वेळी रस्त्यावरील मोठ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी माजी परिवहन समिती सदस्य स्वप्नील कवळी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.