मुंबई

राज्यात समृद्धीची व संकल्पनेची गुढी उभारू

CD

राज्यात समृद्धीची व संकल्पनेची गुढी उभारणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३० : राज्यात गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी सरकारने विजयाची गुढी उभारली. त्यानुसार आता लाडक्या बहिणी, शेतकऱ्यांचीही विकास आणि समृद्धी, संकल्पनेची गुढी उभारणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. ३०) व्यक्त केले. सरकारने राज्यासाठी विकासाचे पर्व आणले असून, राज्याच्या विकासाला गती मिळाल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा स्वागत यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिंदे म्हणाले, ‘ठाणे हे सांस्कृतिक शहर असून, या ठिकाणी चविष्ठ पदार्थ व चांगले खवय्ये आहेत. त्याचबरोबर चांगले राजकारणीदेखील या ठाण्याच आहेत, आमचा अजेंडा फक्त विकास आहे. १५ वर्षांपूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई बदलली आहे. मुंबईचा विकास होत असून, मुंबईतील रस्ते चांगले होत आहेत. राज्याची अर्थव्यवस्था मजबूत असून, ती इतर राज्यांपेक्षा चांगली आहे. विदेशी गुंतवणूकदार राज्यात येत आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, त्या वेळेस दावोसला गेलो, त्या वेळी आठ लाख कोटींचे करार करण्यात आले होते; आता देवेंद्र फडणवीस दावोसला गेले, त्यांनी १५ लाख कोटींचे गुंतवणुकीसंदर्भात करार केले आहेत. त्यामुळे लाखो तरुणांना काम मिळेल.’ चैत्र नवरात्रनिमित्त सर्वसामान्य तरुणांच्या हाताला काम मिळावे, राज्याचा विकासाचा वेग वाढावा, अशी प्रार्थना आई जगदंबे चरणी करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

जे घरी बसतात, त्यांचा खालून क्रमांक
जे काम करतात त्यांचा पहिला क्रमांक येतो; जे घरी बसतात, त्यांचा खालून क्रमांक येतो, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. तसेच आजचा दिवस टीका करण्याचा नाही, आम्ही विरोधकांनाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो, असे सांगितले.

प्रकाश पायरे शिंदे गटात
ठाण्यातील उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत सैनिक म्हणून ओळखले जाणारे नौपाडा भागातील विभागप्रमुख प्रकाश पायरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रविवारी (ता. ३०) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. पायरे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशामुळे ठाकरे यांना नौपाडा भागात धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे १५९ नागरिक बाधित

SCROLL FOR NEXT