मुंबई

पालघर मनसेचा जिल्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

CD

पालघर मनसेचा जिल्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

तारापूर, ता. ३० (बातमीदार) : गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या दिवशीच मनसेमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. बोईसर ओसवालमध्ये गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या मनसेच्या बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला काळे फासण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मनसेमधील अंतर्गत धुसफूस समोर येत असून यापूर्वी अविनाश जाधव आणि पालघरचे मनसेचे माजी जिल्हाप्रमुख समीर मोरे यांच्यात थेट हाणामारीचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर समीर मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला; मात्र अवघ्या काही दिवसांतच मोरे यांनी पुन्हा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत घरवापसी केली; मात्र रविवारी मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला काळे फासल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मनसेमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT