मुंबई

अखेर दुचाकीचोर पोलिसांच्या जाळ्यात

CD

अंबरनाथ, ता. ३० (वार्ताहर) : हॉटेलसमोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना अंबरनाथमध्ये नुकतीच घडली होती. अखेर एक महिन्यानंतर या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, दुचाकीही हस्तगत करण्यात आली.

अंबरनाथ पश्चिमेला कल्याण-बदलापूर महामार्गालगतच्या एका हॉटेलसमोर नजीर अहमद खान (६०) यांनी आपली दुचाकी उभी करून ठेवली होती. ते काही कालावधीसाठी हॉटेलमध्ये गेले होते. याच वेळी चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून फरार झाला होता. ही घटना २ फेब्रुवारीला रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली होती. या संदर्भात नजीर खान यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. घटनेच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असताना गुप्तहेरामार्फत पोलिसांना बातमी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी अकिल मुनिर खान (वय ३७) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याजवळून महागडी दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आला आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 Declared : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी, पुणे-मुंबई की कोकण? कोणता विभाग अव्वल? जाणून घ्या...

LPG Chhotu Cylinder: छोटू गॅस सिलेंडरचे भाव भडकले! घरगुती LPG पेक्षाही तिप्पट महाग; 5 किलो गॅस आता कितीला?

Bhor Minor Assault Case : पुणे चिमुकली अत्याचारात धक्कादायक बाब उघड, फॉरेन्सिक पथक दाखल; गोठ्यात नेऊन बलात्कार, आरोपी जेलची हवा भोगलेला

Mumbai T20 League: मुंबई टी-२० लीगसाठी आज लिलाव; पुरुष अन् महिला विभागात २,४११ खेळाडूंचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रस्तावित ५२९ झाडांच्या तोडीविरोधात नागरिक रस्त्यावर

SCROLL FOR NEXT