मुंबई

चिमुकल्यांची आजींसोबत साक्षरता रॅली

CD

चिमुकल्यांची आजींसोबत साक्षरता रॅली
ठाणे शहर ता. ३० (बातमीदार) : आम्ही आजींना शाळेत पाठवून साक्षर केले, तुम्हीही तुमच्या आजींना शाळेत पाठवा आणि साक्षर करा, असा संदेश देत नातवांनी वागळे इस्टेट परिसरात शिक्षण साक्षरता रॅली काढली. गुढीपाडव्याच्या दिवशी काढलेल्या रॅलीत नातवांसोबत शाळेत जाणाऱ्या आजींसह त्यांच्या सुनांनीदेखील सहभाग घेतला होता. सासू, सुना आणि नातवांची ही रॅली ठाण्यात चर्चेचा विषय ठरली.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथे गेल्या दोन वर्षांपासून वृद्ध महिलांसाठी आजी आईंची शाळा भरते. या शाळेत ६० वर्षांपासून ८० वर्षांपर्यंतच्या ४२ वृद्ध महिला शिक्षण घेत आहेत. वर्षभरापूर्वी इथे २७ महिला शिक्षण घेत होत्या; मात्र यावर्षी त्यात वाढ झाली आहे. आता दोन सत्रांत ही शाळा भरते. सायंकाळी भरणाऱ्या या शाळेत आजींना सोडण्यासाठी काही आजींचे नातू येतात. येथे मराठी, इंग्रजी अक्षर ओळखीपासून तर स्मार्टफोन कसा हाताळावा यासोबतच वाचन, लेखन शिकवले जाते. आणखी काही वृद्धांना या शाळेत यायचे आहे. त्याकरिता गुढीपाडव्याच्या नववर्षाचे निमित्त साधून या परिसरात आजी आईंच्या शाळेतील वृद्ध विद्यार्थिनींनी (ता. ३०) साक्षरता रॅली काढली.

सासूसह सुनांचाही सहभाग
रॅली वागळे इस्टेट परिसरातील कैलास नगर, शांती नगर, श्रीनगर आदी भागातून काढण्यात आली. सायंकाळी ४ वाजता काढलेल्या रॅलीचा साडेपाच वाजता समारोप करण्यात आला. रॅलीत आजींसोबत त्यांच्या सुनांनीदेखील सहभाग घेतला होता. इतरांनीही साक्षर व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. जयश्री फाउंडेशन आणि के. वी. सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही शाळा चालवली जात आहे. त्यांना मोफत गणवेश शैक्षणिक साहित्य आणि इतर सुविधा पुरवल्या जातात, असे माधुरी पाटील आणि हरेश गोगरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Rule: ग्राहकांची फसवणूक थांबणार! मेनू, बिल आणि डिस्प्लेवर पनीरची खरी माहिती द्यावीच लागणार, FDA चा कडक नियम लागू

Vaibhav Sooryavanshi : वैभव 'बालमजूर'; त्याने क्रिकेटपेक्षा अभ्यासावर लक्ष द्यावे! राजस्थान रॉयल्सविरुद्ध FIR दाखल होणार? Video

चाकणमध्ये ३ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...; बिहारमधील मुलाचं कृत्य

Who is Nandini Sharma? महिला प्रीमिअर लीग गाजवली अन् थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात एन्ट्री; हॅटट्रिकचा अनोखा विक्रम नावावर...

कारला एसटी बस घासली, चालकाची सटकली; बस ड्रायव्हरसह महिला प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT