मुंबई

तनिष्कांनी उत्साहात उभारली भक्ती-शक्ती अन् एकात्मतेची गूढी

CD

तनिष्कांनी उभारली भक्ती-शक्ती
अन् एकात्मतेची गुढी
भांडुप, ता. ३० : कुठे डॉक्टर तर कुठे वकील, कुठे शासकीय अधिकारी तर कुठे महिला पोलिस अन् त्यांच्या सोबतीला पारंपरिक वेश परिधान करून मोठ्या संख्येने आलेल्या तनिष्का सदस्या... हे चित्र होते ‘तनिष्का व्यासपीठा’च्या १२व्या वर्धापनदिनाचे. यानिमित्त सध्याच्या बदललेल्या समाजात आपली संस्कृती, परंपरा पुन्हा रुजावी आणि समाजातील सलोखा वाढीस लागून सकारात्मक बदल घडविण्यासाठी रविवारी (ता. ३०) भांडुप येथे ‘भक्ती, शक्ती आणि एकात्मते’ची गुढी उभारण्यात आली.

या कार्यक्रमाला भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ पाटील, शीतल बाबर यांच्यासह महिला आणि पुरुष अधिकारी तसेच तनिष्का सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गुढी उभारल्यावर तनिष्का सदस्य आणि उपस्थितांनी महिला सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाची जपणूक यावर आधारित विशेष ‘संकल्प’ घेऊन या विषयावर समाजासाठी भरीव योगदान देण्याचे ठरवले. तनिष्का समन्वयक रेणुका साळुंखे, कांजूर भांडुप पूर्वच्या प्रमुख स्नेहा जंगम, अश्‍विनी वैद्य आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

यंदाच्या गुढीपाडव्याला ‘तनिष्का’ने १३व्या वर्षात पदार्पण केले. राज्यभरात ‘भक्ती, शक्ती आणि एकात्मते’च्या गुढ्या ठिकठिकाणी उभारून ‘तनिष्का व्यासपीठा’चा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी स्वतःमध्ये बदल घडवून क्षमता, कौशल्यांचा विकास साधून समाजात सकारात्मक पद्धतीने परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने व्यासपीठाची स्थापना करण्यात आली होती. या काळात तनिष्का सदस्यांनी स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्यासोबतच सामाजिक समस्या सोडविण्यापासून ते आरोग्य, पर्यावरण, आर्थिक स्वावलंबन यांसारख्या विविध विषयांवर मोठे कार्य उभे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

‘मी खूप बदनाम आहे, माझा भूतकाळ सडलेला आहे’ असं का म्हणालेल्या रेखा?

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT