मुंबई

ट्रक चालकाचा केबिनला आग

CD

ट्रकचालकाच्या केबिनला आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : वागळे इस्टेट, हाजुरी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकच्या केबिनला अचानक रविवारी (ता. ३०) मध्यरात्री बारा वाजून १० मिनिटांनी आग लागली. ही आग अवघ्या १५ मिनिटांमध्ये नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
............

डम्परची कारला धडक
ठाणे, ता. ३० : मुलुंड चेकनाका येथून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर डम्परने चारचाकी कारला धडक दिली. ही घटना रविवारी (ता. ३०) दुपारी चारच्या सुमारास रहेजा पोलिस चौकीजवळ घडली. या घटनेत कारचालक दिनेश ठाकूर हा जखमी झाला असून या घटनेनंतर तीन हात नाक्याकडे येणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. ती दोन्ही वाहने रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. कारचे नुकसान झाले आहे. डम्परचालक राजीव पाल हे मुलुंड येथून दिव्याला निघाले होते. तर कारचालक ठाकूर हे मुलुंड येथून कळव्याला निघाले होते. याचदरम्यान डम्परने कारला धडक दिली. या वेळी कारमधून चालक आणि मालक असे दोघे जण प्रवास करत होते. त्यामुळे कारचालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वागळे इस्टेट पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेतली. अपघातामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. ती वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहने रस्त्याच्या एकाला बाजूला केली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT