बदलापुरात भंगाराच्या दुकानाला भीषण आग
बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : पनवेल रिंगरूट रस्त्यालगत असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला रविवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत भंगाराच्या साहित्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.
बदलापूर पूर्वेकडील पनवेल रिंगरूट रस्त्यालगत असलेल्या भंगाराच्या दुकानाला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. या वेळी या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे स्थानिक रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी येथील दुकानाचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले. मिळालेल्या माहितीनुसार हे भंगाराचे गोडाऊन अनधिकृतपणे या ठिकाणी सुरू होते. शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या आगीच्या घटनेचा तपास केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.