मुंबई

जारद्वारे पाणी विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : जिल्‍ह्यातील दुर्गम भागातील गाव-पाड्यांसह महाड, खोपोली, खालापूर, पेण, म्‍हसळासारख्या शहरांतही पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्‍या आहेत. त्‍यामुळे अनेकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाईची समस्‍या दिवसेंदिवस वाढत असल्‍याने, जारमधून पाणीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. गल्लोगल्ली आरओ प्लान्टचा व्यवसाय बोकाळला आहे.
रायगड जिल्ह्यात आजच्या घडीला जवळपास २५० ते ३०० पाणी शुद्ध करून विक्री करणारे प्लान्ट सुरू असून यातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. याठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी कोणताही शास्‍त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब होताना दिसत नाही. त्‍यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्‍याचे दिसते. शिवाय, जारमधील पाणी शुद्ध की अशुद्ध, हे तपासण्यासाठीही कुठलीच यंत्रणा नाही. जारचे पाणी तपासण्याबाबत आम्हाला कोणतेचे आदेश नाहीत, अशा स्पष्ट शब्दात अन्न व औषध प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्‍याचे दिसते.
पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन भटकंती करण्यापेक्षा जारमधील पाणी विकत घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. दोन ते तीन वर्षांत जारने पाणीविक्री करण्याचा नवा व्यवसाय गावागावांत बोकाळला असून पाण्याच्या शुद्धतेवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. यामुळे टंचाईग्रस्त नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच साधारण फेब्रुवारीपासूनच काही गावांत पाणीटंचाईची तीव्रता जास्त जाणवत आहे. त्यामुळे जारचे पाणी विकणाऱ्यांचा व्यवसाय तेजीत आहे. आजघडीला रायगड जिल्ह्यात अडीचशे ते तीनशे आरओ प्लान्ट सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राकेश पाटील यांचे म्हणणे आहे; मात्र हे पाणी खरोखरच शुद्ध आहे का, त्यातील घटक मानवी जीवास अपायकारक नाहीत ना, यासंदर्भात कोणतीही तपासणी केली जात नाही. पारदर्शक बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायासाठी सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे; मात्र जारबंद पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही किंवा तशा सूचनाही सरकारकडून दिल्‍या नसल्‍याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


कमी गुंतवणुकीत लाखोंचा नफा
सहा महिन्यांच्या हंगामी स्वरूपात सुरू होणारे आरओ प्लान्ट भूछत्र उगवतात त्याप्रमाणे ठिकठिकाणी सुरू होतात. एप्रिलपासूनच मागणी वाढत असल्याने या संधीचा फायदा घेत लाखो रुपये कमवतात. शासनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने कमी गुंतवणुकीत हे प्लान्ट सुरू करण्यात येतात. यासाठी बहुतांश वेळा बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला जातो.

जारसाठी ३००-४०० रुपये डिपॉझिट
जारबंद पाण्यासाठी तीनशे ते चारशे रुपये डिपॉझिट घेतले जाते. त्यानंतर प्रत्येक जारसाठी पन्नास रुपये आकारले जातात. यातील पाणी किती शुद्ध आहे, हे बाहेरून दिसत नाही; पण गरज असते म्हणून ते विकत घ्यावे लागते, अशी प्रतिक्रिया अलिबागमधील नागरिक श्रीनिवास पाटील यांनी दिली.

पाणी शुद्ध करण्याचे ३४ अधिकृत प्रकल्‍प
पारदर्शक बाटलीतील पाणी शुद्ध करण्याचे रायगड जिल्ह्यात ३४ प्रकल्‍प आहेत; पण पारदर्शक नसलेल्या जारद्वारे पाणी विक्री करणाऱ्या प्लान्टधारकांची संख्या मोठी असून ते विनापरवाना व्यवसाय करीत असल्‍याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्‍त एस. डी. मोहिते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर; महसूल पथकाने हॉटेलवर कारवाई केली

SCROLL FOR NEXT