मुंबई

हवेत पसरली धुळच धूळ

CD

ठाणे जिल्ह्यात पाऊस, धुळीचे वादळ
जनजीवन विस्कळित; दिवसभर ढगाळ वातावरण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : ठाणे जिल्ह्यात शहापूर, मुरबाड, उल्हासनगर परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने तडाखा दिला. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. त्याचवेळी ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली, कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरात अचानक धुळीचे वादळ आल्याने पादचाऱ्यासह वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली.
राज्यात विविध भागांत ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण परिसरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी चार वाजता अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे जिल्हातील शहर आणि ग्रामीण परिसराला काही वेळ धुळीने वेढले होते. त्यामुळे वातावरणातील दृश्‍यमानता कमी झाली होती. शहापूरजवळ मुंबई-नाशिक मार्गावर विजेच्या तारा रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळ थांबली होती, तर तानशेत रेल्वेस्थानकात वाऱ्यामुळे लोकलवर पत्रा पडल्याची घटना घडली.

ठाणे शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या होत्या. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चारच्या सुमारास वतावरणात अचानक बदल होऊन वादळी वारा सुरू होऊन सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT