गुणवत्तेशी तडजोड अमान्य
काँक्रीटीकरणाबाबत आयुक्तांची कंत्राटदारांना तंबी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः मुंबई महानगरात सिमेंट काँक्रीट रस्ते बनविण्याची कामे व्यापक स्वरूपात सुरू आहेत. ही कामे करताना काँक्रीटीकरणाच्या कामात गुणवत्तेशी तडजोड केलेली खपवून घेतली जाणार नाही, त्या दृष्टीने सजग राहा, अशी तंबी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी कंत्राटदारांना दिली आहे.
मुंबईत सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. पालिका आयुक्त गगराणी यांनी आज रस्ते कामांचा कंत्राटनिहाय आढावा घेत संवाद साधला. महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम यांच्यासह संबंधित अधिकारी, कंत्राटदारांचे प्रतिनिधी, विविध सेवा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिकेने रस्ते काँक्रीटीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. रस्ते कामे सुरू असताना कंत्राटदारांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग, प्रदूषण टाळण्यासाठी हिरव्या कापडी आच्छादनाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कामे सुरू असताना काही कमतरता राहिल्यास कंत्राटदारांनी सजग राहून तत्काळ दुरुस्ती करावी. कंत्राटदार दुर्लक्ष करीत असेल किंवा जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी करीत असेल, तर कठोर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असे गगराणी यांनी स्पष्ट केले.
...
...तर कंत्राटदार बदलला जाईल!
पूर्व उपनगरांमध्ये पहिल्या टप्प्यातील काँक्रीटीकरणाच्या कामांची गती अत्यंत मर्यादित आहे. कंत्राटदाराने कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास ते कंत्राट काढून घेण्याचा आणि कठोर कारवाई करण्याचा निर्वाणीचा इशारा या वेळी देण्यात आला. काँक्रीट रस्ते पूर्ण झाल्यावर पदपथ चालण्यायोग्य, सुस्थितीत असावेत. संपूर्ण रस्ता स्वच्छ असावा, असेही गगराणी यांनी नमूद केले.
...
डक्टबाबत तोडगा काढा!
रस्त्यांची कामे सुरू असताना उपयोगिता वाहिन्यांचे त्वरित स्थलांतरण करावे. काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर रस्ता खोदण्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. महापालिका मोठ्या प्रमाणावर डक्ट बांधत आहे. या डक्टचा वापर करण्यासंदर्भात उपयोगिता वाहिन्यांच्या संस्थांसमवेत समन्वय ठेवावा. उपयोगिता वाहिन्यांच्या संस्थांच्या अडचणी असतील, तर त्यातून मार्ग काढावा, असे निर्देशदेखील आयुक्त गगराणी यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.