अवकाळीने मोखाड्यात आंबा, काजूचे नुकसान
मोखाडा, ता. ४ (बातमीदार) : मोखाड्यात अवकाळी वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात शुक्रवारी दुपारनंतर अवकाळी, वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसाने काढणीस आलेला आंबा आणि काजू फळाचे नुकसान झाल्याने बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर खोडाळा-विहीगाव रस्त्यावर मोहिते महाविद्यालयाजवळ झाड उन्मळून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वीजपुरवठादेखील खंडित झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान, वादळी पावसामुळे दुधगाव, वाशिंद, जोगलवाडी आणि राजेवाडी येथे अनेक घरांवरील छप्पर ऊडवली असुन घरांची पडझड ही झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.