मुंबई

मोतीलालनगरमधील रहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री

CD

मोतीलालनगरमधील रहिवाशांवर
अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई, ता. ४ : गोरेगावच्या मोतीलालनगरच्या पुनर्विकासात एक आदर्श टाउनशीप तयार केली जाईल. येथील रहिवाशांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. सर्व सोयीयुक्त हक्काची घरे प्रत्येकाला मिळणार, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली.
गोरेगावमधील मोतीलालनगरच्या पुनर्विकासाबाबत हायकोर्टाने निकाल दिला आहे. १४२ एकरवर ‘म्हाडा’मार्फत हा पुनर्विकास होणार आहे. या विकासात रहिवाशांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, या प्रकल्पात रहिवाशांना विश्वासात घ्यावे, संपूर्ण पारदर्शकता असावी, या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
महाविकास आघाडी सरकारने हा ‘विशेष प्रकल्प’ ठरवून त्याअंतर्गत रहिवाशांना १६०० बिल्टअप आकाराची घरे देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र रहिवाशांनी दोन हजार कार्पेट चौरस फुटांची मागणी केली होती. याबाबत रहिवाशांच्या इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश ‘म्हाडा’ला दिले आहेत. या शिष्टमंडळात युवराज मोहिते यांच्यासह किरण निरभवणे, तरसेमसिंग सोहल, मिलिंद अडांगळे, गौतम कांबळे, अलीम खान, अमित काकडे, विजय पोवळे आदी रहिवासी सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजी राजं म्हणायचं', 'राजा शिवाजी'मधील सलमान खान प्रेक्षकांना प्रचंड भावला, शत्रूंना म्हणाला...

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

SCROLL FOR NEXT