उरण, ता. ९ (वार्ताहर) : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या बेजबाबदार वक्तव्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उरण येथे निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याची मागणी केली. या वेळी उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपजिल्हा संघटिका ममता पाटील, उपतालुका संघटिका सुजाता पाटील, उपशहर संघटिका माधुरी चव्हाण, विभागप्रमुख एस. के. पुरो, माजी विभागप्रमुख सूर्यकांत दरने, माजी शहरप्रमुख निरंतर कदम, प्रवीण मुकादम, माजी नगराध्यक्ष परमानंद करगुटकर, ज्येष्ठ कार्यकर्ते गुलजार भाटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक वेळी मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांचा अपमान करीत असल्याने शेतकऱ्यांसह विरोधी पक्षांनीसुद्धा त्यांचा निषेध करून तीव्र संताप व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.