मुंबई

यात्रांबरोबरच लग्‍नसराईला पाणीटंचाईच्या झळा!

CD

पेण, ता. १० (वार्ताहर) : तालुक्यातील खारेपाट विभागात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई भेडसावू लागते. सध्या खारेपाटात पेण पंचायत समितीच्या माध्यमातून १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. असे असले तरी वाड्या-वस्त्यांवर टंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या वाशी-वढावमधील यात्रांबरोबरच लग्नसराईकरिता प्रशासनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एप्रिल-मे महिना हा लग्नसराईचा आणि यात्रांचा असून, ग्रामस्‍थांकडून जोरदार तयारी सुरू आहे. पेण पंचायत समितीच्या माध्यमातून २ एप्रिलपासून खारेपाटातील टंचाईग्रस्‍त भागात पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. या ठिकाणी जवळपास १२ ते १५ टँकरने पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना केवळ १० टँकरने पुरवठा केला जात असल्याने वाड्या-वस्त्यांवरील पाण्याची समस्‍या ‘जैसे थे’ आहे.
एकीकडे उन्हाच्या झळा वाढल्‍या आहेत, तर दुसरीकडे पाण्यासाठी नागरिकांची भरउन्हात पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने खारेपाटातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी पोहोचवणे आवश्यक आहे. येत्या दोन-चार दिवसांवर तालुक्यातील अनेक भागातील यात्रा उत्सव आले आहेत. त्यात लग्नसराईचेही मुहूर्त आहेत. त्‍यामुळे परिसरातील पाणीटंचाई लवकरात लवकर दूर होऊन, वाड्या-वस्त्यांवर टँकरने जास्तीत जास्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पेण खारेपाटातील नागरिक अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करत आहेत. सध्या पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने १० टँकर सुरू करण्यात आले आहेत, मात्र ते अपुरे असून, वाशी भागातील जवळपास २१ वाड्या आहे, त्‍या तुलनेत टँकरची संख्या खूपच कमी आहे. सहा महिने साठवलेला पाणी आता संपले असून, नव्याने टँकरद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने आताच गावागावांत याबाबत जनजागृती करावी तसेच वाशी, वढाव यात्रांबरोबरच लग्नसराई सुरू झाल्याने सुरळीत पाणीपुरवण्यासाठी प्रयत्‍न करावेत.
- गोरख पाटील, माजी सरपंच, वाशी

पेण-खारेपाट विभागाला जवळपास चार-पाच महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने २ एप्रिलपासून पंचायत समितीच्या माध्यमातून १० टँकरने त्या ठिकाणी दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. काही वाड्या वस्त्यांवर पाणी पोहोचत नसेल, तर त्या ठिकाणीही काहीतरी उपाययोजना केली जाईल.
- सूर्यकांत परब, सहाय्यक अभियंता, पंचायत समिती, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: जूनमध्ये तब्बल 13 दिवस बँकांना सुट्टी! महाराष्ट्रात किती दिवस बंद राहणार बँका? RBI ची यादी पाहा

Pune : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय की दारूचा अड्डा? छतावर दारूच्या बाटल्या, VIDEO VIRAL

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड; मनिषा हवालदार यांच्या हस्ताक्षर-स्वाक्षरीची फॉरेन्सिक तपासणी होणार

SCROLL FOR NEXT