अंधेरीत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
विदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या पाच जणांना अटक
अंधेरी, ता. ९ (बातमीदार) ः अंधेरी परिसरात सुरू असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करून विदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अहर मुसा कादरी, आकाश शाहू काळे, मोहम्मद शहानवाज रईस शेख, गोलुसिंग पप्पूसिंग दिपपाल आणि मुस्तफा कैसर चितलवाला अशी या पाच जणांची नावे आहेत.
अटकेनंतर आरोपींना स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. अंधेरीत काहीजण अॅमेझॉन कंपनीचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करून कॅनेडियन नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. एका कॉल सेंटरच्या माध्यमातून ही फसवणूक होत असल्याचे उघडकीस येताच या पथकाने अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, मित्तल इंडस्ट्रीयलमधील एका बोगस कॉल सेंटरमध्ये छापा टाकून पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते सर्वजण स्वयंचलित टेलिफोन प्रणालीद्वारे पूर्व रेकॉर्ड संदेश पाठवून फसवणूक करीत हाेते. अॅमेझॉनवर आयफोन-१६ प्रो मोबाईल खरेदी केला आहे का, खरेदी केला नसेल तर रद्द करण्यासाठी एक क्रमांकाचे बटन दाबावे, असे सांगायचे. नागरिकांनी एक क्रमांक दाबल्यानंतर त्यांचा कॉल बोगस कॉल सेंटरमध्ये ट्रान्स्फर व्हायचा. त्यानंतर संबंधित कर्मचारी त्यांना भीती दाखवून १०० डॉलरचे गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास प्रवृत्त करत होते. या कॉल सेंटरमधून अनेक कॅनेडियन नागरिकांची फसवणूक झाली होती. कॉल सेंटरचा मालक शैलेश डोबरिया असून, तो गुजरातच्या अहमदाबादचा रहिवासी आहे. त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल फोन, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, हार्डडिस्क आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.