उल्हासनगर, ता. १० (बातमीदार) : मागच्या महिन्यात प्रतिनियुक्तीवर उल्हासनगर महापालिकेत डॉ. दीपाली चौगले, अनंत जवादवार हे उपायुक्त पदावर रुजू झाले आहेत. त्यापूर्वी विशाखा मोटघरे या उपायुक्त म्हणून दाखल झालेल्या आहेत. तत्पूर्वीच प्रतिनियुक्तीवर तीन सहाय्यक आयुक्त कार्यरत असून, तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांच्या कालावधीत उप मुख्य लेखा अधिकारी डॉ. विजय खेडकर यांच्याकडे उपायुक्त पदाचा प्रभारी पदाचा पदभार सोपवण्यात आलेला आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या सर्व उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांवर विविध विभागांची जबाबदारी सोपवल्याने विभाग वाटपाची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे विकासकामांच्या योजनांच्या फाईली लवकर निकाली लागणार आहेत.
आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उपायुक्त (१) विशाखा मोटघरे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना) मालमत्ता कर, उद्यान व वृक्ष प्राधिकरण, मालमत्ता, माहिती व तंत्रज्ञान (नागरी सुविधा केंद्र) सार्वजनिक आरोग्य विभाग सोपवले आहे. उपायुक्त डॉ. दीपाली चौगले सामान्य प्रशासन (आस्थापना व प्रशासन) अभिलेख, विधी, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा, अग्निशमन, भांडार विभागाचे काम पाहणार आहेत. उपायुक्त अनंत जवादवार यांच्याकडे पाणीपुरवठा, दिव्यांग व कल्याणकारी योजना, महिला व बालकल्याण समाज विकास, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची जबाबदारी आहे. प्रभारी उपायुक्त डॉ. विजय खेडकर यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य, वाहन व परिवहन, जनगणना व आधार केंद्र, पर्यावरण, जनसंपर्क, निवडणूक, विवाह नोंदणी, जन्ममृत्यू नोंदणी, बाजार व परवाना, क्रीडा व सांस्कृतिक विभाग दिला आहे. तसेच सहायक आयुक्त अजय साबळे यांच्याकडे वाहन व परिवहन, जनगणना व आधार केंद्र, जनसंपर्क, निवडणूक, बाजार व परवाना, क्रीडा व सांस्कृतिक विभाग असणार आहे. सहायक आयुक्त सुनील लोंढे यांच्याकडे सामान्य प्रशासन शाखा, भांडार, अभिलेख, महिला व बालकल्याण, सुरक्षा विभाग आहे. सहायक आयुक्त मयूरी कदम यांच्याकडे मालमत्ता कर, सार्वजनिक आरोग्य, उद्यान व वृक्ष प्राधिकरण, मालमत्ता, माहिती व तंत्रज्ञान, शिक्षण विभाग आहे. तर सहायक आयुक्त विशाल कदम यांच्याकडे सामान्य प्रशासन आस्थापना शाखा, विधी, दिव्यांग कल्याणकारी योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, आपत्ती व्यवस्थापन हे विभाग सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या अंतर्गत नगररचना, अनधिकृत बांधकाम निष्कासन, विद्युत अभियांत्रिकी, महापालिका सचिव हे विभाग आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.