उरणचे पदपथ व्यापाऱ्यांनी केले गिळंकृत
उरण, ता. ९ (वार्ताहर) ः मागील काही वर्षांपासून शहरात विक्रेत्यांचे पदपथावरील अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना चालताना अडचण निर्माण होत आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. तसेच लोकसंख्येतदेखील झपाट्याने वाढ झाल्याने सकाळ-सायंकाळी रस्त्यावर नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे शहरातील रस्तेही अपुरे पडू लागले आहेत. त्यातच या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. नगरपालिकेने शहराची निर्मिती करताना वाहनांबरोबरच नागरिकांना चालण्यासाठी पदपथ निर्माण केले आहेत. रस्ते तयार करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांची निर्मिती केली आहे, मात्र व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पदपथावरील अतिक्रमण वाढले आहे. अनेक दुकानदारांनी आपली शटर पुढे आणली आहेत. तसेच दुकानासमोरील जागेवर सामान ठेवून जागा गिळंकृत केली आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गिळंकृत केलेल्या पदपथावर नगरपालिकेने कारवाई करून ते खुले करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
.............
चौकट
प्रशासनाचा अतिक्रमण विभाग वारंवार कारवाई करीत असतो. काही अधिकारी मार्चमुळे प्रशासकीय कामात व्यग्र असल्याने कारवाईत दिरंगाई होत आहे, मात्र या काळात जर पदपथावर व्यापाऱ्यांनी बस्तान बसविले असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उरण नगरपालिकाचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.