रोह्यात आजीची नातवासह आत्महत्या
तिसऱ्या मजल्यावरून घेतली उडी
रोहा, ता. ९ (बातमीदार) ः एका आजीने आपल्या एक वर्षाच्या नातवाला सोबत घेऊन राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
ऊर्मिला सिद्दीराम कोरे (वय ५२, रा. ओम चेंबर्स बिल्डिंग, कोलाड रोड, रोहा, मूळ रा. सोलापूर) व वेदांत विवेक भोगडे अशी दोघांची नावे असून बुधवारी (ता. ९) सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. शहरातील दमखाडीजवळील गजबजलेल्या परिसरात ओम चेंबर्स बिल्डिंग या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सिद्दीराम कोरे हे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. ते धाटाव एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या पत्नीला मागील चार वर्षांपासून मानसिक आजार जडला होता. त्यावर औषधोपचार सुरू होते. ती औषधे वेळेवर घेत नसल्याने तिचा आजार बळावला होता. दुसरीकडे तिच्या नातवालादेखील ट्यूमर झाल्याने त्याला उपचारासाठी मुंबईत घेऊन जाणार होते; मात्र सकाळीच ऊर्मिला हिने आपला नातू वेदांत विवेक भोगडे याला सोबत घेऊन ओम चेंबर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वेदांतची स्थिती नाजूक असल्याने त्याला तातडीने पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.