मुंबई

सिडकोच्या दरवाढीविरोधात मनसेचे चित्र प्रदर्शन

CD

सिडकोच्या दरवाढीविरोधात मनसेचे चित्र प्रदर्शन
वाशी, ता. ९ (वार्ताहर) : सिडकोने ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर केलेल्या घरांच्या लॉटरीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांच्या किमती ५० लाख ते एक कोटी रुपयांदरम्यान ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आंदोलन करीत आहेत. तर आता मनसेच्या वतीने वाशीमध्ये या दरवाढीविरोधात चित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
सिडको घरांच्या वाढत्या किमतीविरोधात मनसेकडून मागील काही दिवसांत आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये मानवी साखळी, पोस्ट कार्ड आंदोलन आणि इंजेक्शन मोर्चा यांसारख्या लोकशाही मार्गांचा अवलंब करूनही सिडको प्रशासन आणि राज्य सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर मनसे आणि सिडको लॉटरी विजेत्यांकडून येत्या रविवारी (ता. १३) वाशीतील महात्मा जोतिबा फुले स्मृती भवन येथे भव्य चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी घरांचे दर २० ते २५ टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली होती, तर मंत्री उदय सामंत यांनीही विधानमंडळात सरकारची भूमिका घरांचे दर कमी असावेत, अशी असल्याचे सांगितले होते; मात्र अद्याप राज्य सरकार आणि सिडकोकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नसल्याने दरवाढीविरोधात चित्र प्रदर्शन भरविण्यात आल्याचे मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.
..........
प्रदर्शन स्थळ :
महात्मा जोतिबा फुले स्मृती भवन,
स्वामी विवेकानंद कम्युनिटी हॉल,
भूखंड क्र. १२ व १३, वाशी पोलिस ठाणेशेजारी,
सेक्टर - ३, वाशी, नवी मुंबई.
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT