मुंबई

भारतीय नौदलासाठी २६ राफेल मरीन लढाऊ विमाने

CD

भारतील नौदलाची सामर्थ्यशक्ती वाढणार
२६ राफेल मरीन विमाने खरेदीस केंद्राची मान्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात अधिक वाढ होणार आहे. नौदलासाठी २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी अंदाजे ६३ हजार कोटी रुपयांचा करार लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून ही लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत.
नौदलाच्या ताफ्यात २२ सिंगल-सीटर विमाने तर प्रशिक्षणासाठी ४ ट्विन-सीटर विमाने सहभागी होणार आहेत. ही विमाने ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘आयएनएस विक्रमादित्य’ या भारतीय विमानवाहू नौकांवर तैनात केली जातील. सध्या या नौका मिग-२९ के विमानावर अवलंबून आहेत. या विमानांच्या कार्यक्षमतेबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली. नौदलाच्या या विमान खरेदीच्या प्रस्तावाला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून (सीसीएस) लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. ती मिळाल्यानंतर करारावर स्वाक्षऱ्या होतील आणि विमानांची निर्मिती प्रक्रिया सुरू होईल.
---
कधी येणार ताफ्यात?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी म्हणजे २०२९च्या अखेरपर्यंत ती भारतात येण्यास सुरुवात होईल. संपूर्ण २६ विमाने येण्यास २०३१ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
----
हवाई सामर्थ्य वाढणार

बहुउद्देशीय क्षमता असलेल्या राफेल मरीन लढाऊ विमानातून हवेतील, जमिनीवरील तसेच समुद्रातील लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. यामध्ये मेटेओर, एमआयसीए आणि स्कॅल्पसारखी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, तर स्पेक्ट्रासारखी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक संरक्षण प्रणाली आहे. सध्या कार्यरत असलेली रशियन बनावटीची मिग २९ के विमाने कालबाह्य झाल्याने त्यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. आता राफेल मरीन विमानांमुळे आयएनएस विक्रांत आणि विक्रमादित्यची लढाऊ क्षमता वाढणार आहे.
----
मुख्य वैशिष्ट्ये :
- विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाणाची क्षमता
- हवा, जमीन आणि समुद्रावर एकाच वेळी हल्ला करण्याची क्षमता
- वाईट हवामानातही सहज उड्डाण करण्याची क्षमता
- शत्रूच्या रडारपासून स्वतःला लपवण्याची क्षमता
........
क्षेपणास्त्रांची वैशिष्ट्ये
मेटेओर क्षेपणास्त्र - १५० किमीपेक्षा अधिक अंतरावर हल्ला
एमआयसीए क्षेपणास्त्र - हवेतील लक्ष्यावर अचूक हल्ला
स्कॅल्प क्रूझ मिसाइल - जमिनीवर लांब पल्ल्याच्या लक्ष्यावर हल्ला
स्पेक्ट्रा प्रणाली - शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण
.........
तांत्रिक वैशिष्ट्ये
गती - ताशी १,९१२ किमी
वजन - २४.५ टन
लांबी - १५.३ मीटर
पंख्यांची रुंदी - १०.९ मीटर
उंची - ५.३ मीटर
उड्डाण श्रेणी - १८५० किमी
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT