बचत गटांच्या ५० महिलांना रिक्षावाटप
पालिकेकडून मोफत प्रशिक्षण व परवाने मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईतील बचत गटांच्या महिला आता प्रवासी रिक्षा चालविणार आहेत. कुर्ला येथील एका कार्यक्रमात महिलांना ५० रिक्षांचे वाटप करण्यात आले असून, महिलांना मोफत प्रशिक्षण आणि सर्व प्रकारचे परवानेही देण्यात आले आहेत.
मुंबई महापालिका, केंद्र सरकारच्या दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि टीव्हीएस यांच्या वतीने ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आले. कुर्ला येथील नेहरूनगरातील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी (ता. ८) हा कार्यक्रम पार पडला. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, पालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, टीव्हीएसचे अधिकारी निशांत दास, अभ्युदय बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक प्रीती सावंत आदी उपस्थित होते. पालिकेकडून महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण आणि परवाने मोफत देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.