पालघर जिल्ह्याला नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय
मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
पालघर, ता. ९ (बातमीदार) ः जिल्ह्यात नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, पुढील आठवड्यात याविषयी शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालघर येथील लोकदरबाराच्या सुरुवातीला केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज (ता. ९) दुपारी लोकदरबाराचे आयोजन केले होते. या लोकदरबारासाठी ते आज पालघरमध्ये आले होते. प्रथम त्यांनी पालघर एसटी आगारात येऊन नवीन पाच बसचे लोकार्पण केले. प्रत्येक आगारात पाच नवीन बस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. राज्य सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येणार आहे. आज उपस्थित अर्जदार जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक व जिल्हाप्रमुख यांनी पालघर जिल्ह्यासाठी परिवहन कार्यालय असावे, ही मागणी सातत्याने केली होती. त्यानुसार नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी मी आज मंजुरी दिली असून, याच महिन्यात कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय पुढील आठवड्यात जारी करण्यात येईल, असे त्यांनी आज स्पष्ट केले.
...
उमरोळीमध्ये परिवहन क्षेत्र
पालघर जिल्हा मुख्यालयाजवळ उमरोळीमध्ये असणाऱ्या १० एकर जागेत प्रादेशिक परिवहन चाचणी क्षेत्र असेल. त्याला एमएच ५९ असा क्रमांक निश्चित करण्यात आला आहे, असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यालय उभारण्याचे काम तसेच चाचणी ट्रॅक उभारण्याच्या कामाला याच वर्षात सुरुवात होणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
...
लोकदरबारात ४०० तक्रारी
आजच्या लोकदरबारात ४०० लोकांच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही, अशी तक्रार एका विद्यार्थिनीने मंत्री सरनाईक यांच्याकडे आज केली. त्यावर अधिकाऱ्यांना बोलावून एक तासाच्या आत या मुलीला जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, असे आदेश दिले. त्यानंतर दरबारातच तिला ते देण्यात आले. लोकदरबाराला मोठा प्रतिसाद मिळाला. समस्या सुटल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.