मुंबई

जलवाहिन्या, मोठ्या केबलचे काँक्रिटीकरणाला अडथळे

CD

जलवाहिन्या, मोठ्या केबलचे काँक्रीटीकरणाला अडथळे
३१ मे च्या डेडलाइनने कंत्राटदारांचे वाढले टेन्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः माटुंगा पूर्वेतील पालिकेच्या एफ उत्तर विभागांतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. बहुतांश पदपथांखाली जलवाहिन्या आहेत. शहर आणि उपनगरांत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामात जलवाहिन्या आणि मोठमोठ्या केबलचा अडथळा आहे. त्यामुळे रस्ते कामाला गती नसल्याने कंत्राटदारांचे ३१ मेच्या डेडलाइनचे टेन्शन वाढले आहे.
सायन पूर्व परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण कामांची अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. या वेळी जलवाहिन्यांची रस्ते कामात अडचण असल्याचे दिसून आले. एफ उत्तर विभागात बहुतांशी पदपथांखाली जलवाहिन्या आहेत. त्‍यामुळे आवश्‍यक तेवढ्याच लांब अंतराच्या जलवाहिन्या अंथरण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या. कामाला विलंब होण्याच्या भीतीने आणि कामे नियोजित वेळेत पूर्ण होणार नसल्याने कंत्राटदारांचे टेन्शन वाढले आहे.

कामात समन्वय ठेवा
मुंबईत सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरण कामांचा वेग वाढण्याच्या दृष्टीने रेडी मिक्स काँक्रीटची पुरवठा साखळी अधिक मजबूत करून त्यासाठी प्रकल्प चालक आणि रस्ते कामांचे कंत्राटदार यांनी आपापसात समन्वयाने त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.

नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना
रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पातून तयार मिश्रण वाहून नेणाऱ्या वाहनांची संख्या वाढवणे, या वाहनांच्या फेऱ्यांची वेळ कमी करणे, जेणेकरून काँक्रीटीकरणाची गती वाढेल, याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी केल्या. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे कोणत्याही परिस्थितीत ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करायची आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीत काँक्रीटीकरणाच्या कामांची अपेक्षित गती राखावी, यासाठी आरएमसी प्रकल्पांना रेडी मिक्स काँक्रीटची पुरवठा साखळी अधिक मजबूत करणे आवश्यक असल्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT