खासगी टँकरमालक आजपासून संपावर
कोस्टल रोड, मेट्रो, इमारत बांधकामांवर होणार परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुंबईतील खासगी विहीरमालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर ट्रॅंकरमालकांना या विहिरीतून पाणी भरण्यास विहीरमालकांनी विरोध केला आहे. काही जाचक अटींची अंमलबजावणी करणे कठीण असल्याने याविरोधात टँकरमालकांनी गुरुवारपासून (ता. १०) टँकरने पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे कोस्टल रोड, इमारत बांधकामे, मेट्रो आदी विकासकामांसह हॉटेल्स, मॉल, रुग्णालयांवर परिणाम होण्याची शक्यता आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांतील विहिरी, बोअरवेलमधून सुमारे दोन हजार खासगी टँकरद्वारे रोज पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त ३०० एमएलडीपेक्षा अधिक पाणीपुरवठा केला जातो; मात्र बेसुमार उपशामुळे भूजलाची पातळी घटत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने सप्टेंबर २०२०मध्ये नियमावली जारी केली होती. त्यानुसार विहीरमालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची (सीजीडब्ल्यूए) परवानगी सादर करणेही बंधनकारक केले आहे; मात्र आतापर्यंत विहीरमालकांनी त्याबाबत टाळाटाळ केल्याने महापालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे विहीरमालकांनी टँकरमालकांना पाणीपुरवठा करण्यास मनाई केली आहे. तसेच नियमावलीतील काही अटी पाळणे कठीण असल्याने टँकर असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे; मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने गुरुवारपासून टँकरमालक संपावर जाणार आहेत.
..........
गैरसोय होणार
टँकरद्वारे मेट्रोच्या बांधकाम, रेल्वे प्राधिकरण, शौचालये, हॉटेल्स, रुग्णालये, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, उद्याने तसेच इमारत बांधकामांना पाणीपुरवठा केला जातो; परंतु टँकरमालकांच्या संपाचा या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.