मुंबई

केईएमच्या नॅश क्लिनिकमध्ये १०० हून अधिक रुग्णांवर उपचार

CD

केईएमच्या नॅश क्लिनिकमध्ये १०० हून अधिक रुग्णांवर उपचार
दारू न पिता होणाऱ्या यकृताच्या आजारांवरील उपचार सोयीस्कर
मुंबई, ता. १२ : दारूच्या अतिसेवनाने यकृताचे आजार होतात अशी सर्वसामान्यांची समज आहे. पण अनेकदा दारू न पिताही अनेकांना यकृताचे विकार होतात. यात शरीरातील चरबी महत्त्वाची भूमिका बजावते. मोठे पोट, लठ्ठपणा आणि ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे. वाढलेल्या पोटाची चरबी आणि वजन नियंत्रणात न ठेवल्यास त्यांना ‘फॅटी लिव्हर’सारखा गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो.
सध्या या आजाराची लक्षणे तरुणांमध्ये जास्त दिसून येत आहेत. याचसाठी जानेवारी महिन्यात पालिकेच्या केईएम रुग्णालयात हा आजार बरा करण्यासाठी विशेष ‘नॅश क्लिनिक’ सुरू करण्यात आले. या क्लिनिकअंतर्गत आतापर्यंत १२५ हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

फॅटी लिव्हरचे दुष्परिणाम
फॅटी लिव्हरमुळे कर्करोग, हृदयविकारासारखे गंभीर आजार आणि किडनी खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. नॉन-अल्कोहोलिक सोरायसिस या आजारामध्ये फॅटी लिव्हरमुळे रुग्णाला सोरायसिस होऊ शकतो. अवेळी झोपणे, आळसपणा, व्यायाम न करणे, आरामदायी प्रवास, तासनतास एकाच ठिकाणी बसून राहणे, शरीराची अपेक्षित हालचाल न करणे आदी सर्व कारणांमुळे हल्लीच्या तरुण पिढीमध्ये पोटाचा घेर वाढणे, चरबी वाढणे, लठ्ठपणा येणे, वजन वाढणे यामुळे त्यांना ‘फॅटी लिव्हर’सारख्या आजाराने ग्रासल्याचे निदर्शनास येते. किमान १०० रुग्णांपैकी १० ते २० जणांमध्ये हल्ली हा ‘फॅटी लिव्हर’ आजार असल्याचे निदर्शनास येत आहे.

आतापर्यंत १२५ रुग्णांवर उपचार झाले आहेत. पण हे सर्व रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे नातेवाईकच आहेत. यासंबंधित जास्तीत जास्त जनजागृती करण्याची गरज आहे. रुग्णांनी फॅटी लिव्हरला गंभीरपणे घेतले पाहिजे. फॅटी लिव्हरची लक्षणेही लगेच दिसत नाहीत.
- डाॅ. आकाश शुक्ला,
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, विभागप्रमुख

हृदयाचीही घ्या काळजी
मानेवर काळे होणे
घशावर छोटे स्पॉट झाल्‍यास यकृतासोबत हृदयविकाराचाही धोका संभवतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याबाबतीत डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

व्हायरल इन्फेक्शनचा धोका
हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सीचा धोका असतो. यात आईकडून मुलाला हेपेटाइटिस बी तर रक्त चढवल्यातून हेपेटायटिस सीचा धोका असतो.

यकृताच्या आजाराचे सर्वाधिक प्रमाण
अल्कोहोल आणि एमएसएलडी ७० टक्के
हेपेटायटिस बी १५ आणि अन्य आजार १५ टक्के
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT