मुंबई

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांची मोर्चेबांधणी

CD

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : विनाअनुदानित व अंशतः अनुदानित तुकड्यांवरील १ नोव्हेंबर २००५पूर्वीच्या शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रस्ताव १३ एप्रिलपर्यंत शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांकडे पाठवून संबंधित कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी पात्र आहेत किंवा नाहीत याची पडताळणी ३० सप्टेंबरपर्यंत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे १ नोव्हेंबर २००५पूर्वी सेवेत आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास आशेचा किरण दिसू लागला आहे.
विविध संघटनांनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वैयक्तिकरीत्या एकूण ४८ याचिका केल्या आहेत. याचिकांद्वारे जुन्या पेन्शनची मागणी न्यायालयामार्फत शासनाकडे केली होती. १०० टक्के अनुदानित शाळांतील तुकड्या १ नोव्हेंबर २००५पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तत्त्वावर सुरू होत्या. त्या तुकड्यांवरील कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे व उच्च माध्यमिकच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे ४५ दिवसांच्या आत पाठवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत पडताळणी करून ३० सप्टेंबरपर्यंत पात्र-अपात्र यादी जाहीर करावयाची आहे. या निर्णयामुळे १ नोव्हेंबर २००५पूर्वी सेवेत आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास आशेचा किरण दिसू लागला आहे.
-------------------------------------------
मुख्यमंत्र्यांना निवेदन
न्यायालयाच्या आदेशातील मुद्दा क्र. १७ (ग) नुसार जे कर्मचारी न्यायालयात याचिका दाखल करू शकले नाहीत, त्यांनाही हा निर्णय लागू करण्यात आला असल्याने शासनाने तसे परिपत्रक निर्गमित करून १ नोव्हेंबर २००५पूर्वी विनाअनुदानावर व अंशतः अनुदानावर असलेल्या कर्मचाऱ्यांचेही प्रस्ताव मागवण्याचे निवेदन शिक्षण क्रांती संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांसह प्रधान सचिवांकडे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT