मुंबई

वीजनिर्मिती करणारी आदर्श शाळा

CD

टोकावडे, ता. १० (बातमीदार)ः ग्रामीण भागातील शाळांना देयक भरणे शक्य नसल्याने अनेकदा वीज मीटर काढण्यासारख्या कारवाईला सामोरे जावे लागते, पण मुरबाडच्या मिल्हे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने सौरउर्जेपासून वीजनिर्मिती करताना आदर्श शाळेचा नावलौकिक मिळवला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेची मुरबाड तालुक्यात मिल्हे गावात पहिली ते चौथी पर्यंत केंद्र शाळा आहे. या शाळेमध्ये सुमारे ४४ विद्यार्थी शिक्षण घेत असून, व्यावसायिक दरांमुळे शाळेला वर्षाकाठी २२ ते २३ हजारांची वीजदेयके भरण्याची वेळ येत होती. त्यामुळे अनेकदा देयके भरली नसल्यामुळे मीटर काढून नेण्याच्या प्रकारांनाही सोमोरे जावे लागले होते. या प्रकारांमुळे मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे वाढत्या वीजदेयकांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी महावितरणच्या ‘नेट मीटरिंग’योजनेंतर्गत दोन किलो वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प बसवला आहे.
---------------------------------------------------------
अखंडित वीजपुरवठा
- मिल्हे गावात एक बंद अवस्थेतील सौरऊर्जा प्रकल्प पडून होता. या प्रकल्पातील दोन बाय तीन आकाराच्या आठ सोलर प्लेट जिल्हा परिषदेच्या शाळेत आणल्या गेल्या. ठाण्याच्या मालती वैद्य स्मृती ट्रस्टचे धनंजय महाजन आणि प्राध्यापक प्रसाद बोडस यांच्या सहकार्याने ही यंत्रणा बसवण्यात आली.
- गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास पाच हजार युनिट वीजनिर्मिती शाळेने केली असून, एक हजारच्या आसपास युनिट शाळेसाठी खर्च केले आहेत. तसेच पावसाळा सोडल्यास इतर दिवसांमध्ये दररोज सहा ते सात युनिट वीजनिर्मिती केली असल्याने शाळेला अखंडित वीजपुरवठा होत आहे.
----------------------------------------------------
वीजनिर्मितीबरोबर शाळेतील पंखे, दिवे, संगणक, पाण्याचे फिल्टर, बोअरवेल, स्मार्ट टीव्हीसह सिंचन व विद्युत उपकरणे चालविली जातात. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे शाळेच्या वीजदेयकांचा प्रश्न सोडवता आला.
- विनोद चौधरी, शिक्षक
---------------------------------
मिल्हे गावामध्ये बंद अवस्थेतील सौरऊर्जा संच पडून होता. ग्रामपंचायतीमधून ठराव घेऊन हा संच शाळेला देण्यात आला. यामुळे शाळेचा वीजदेयकांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.
- पंढरीनाथ घावट, माजी उपसरपंच, मिल्हे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG New Rule: मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये झाले बदल

Mumbai Bakari Eid Market : गेल्या काही दशकांतील सर्वात महागडी ईद! बोकडांच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; पाहा देवनारमधील सद्यस्थिती

'टायटन'ची कथा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! नसिरुद्दीन शाह साकारणार JRD Tata

IND vs AFG: भारताला टक्कर देण्यासाठी अफगाणिस्तानने जाहीर केले तगडे संघ; राशिद खान खेळणार की नाही? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हायटेक होणार! मंदिरात उभारला जाणार भव्य कॉरिडॉर; भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT