मुरबाड, ता. १० (बातमीदार)ः नळ पाणीपुरवठा योजनेचे अपूर्ण कामांमुळे तुळई ग्रामस्थांना मुरबाड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी संतप्त महिलांनी ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पवार यांची गाडी रोखल्याने गोंधळाचे वातावरण झाले होते.
तुळई कलंबाड येथील गावकऱ्यांसाठी एक कोटी ८६ लाखांची जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली. २०२३ साली या योजनेची पूर्णत्वाची मुदतही निघून गेली, परंतु अजूनही योजनेचे काम अपूर्णच आहे. अनेक वेळा लेखी पत्र देऊनही अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी बुधवारी (ता. ९) मुरबाड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. या वेळी ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पवार यांना निवेदन देताना योजनेत हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली. या वेळी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश संबंधित पाणीपुरवठा अधिकारी यांना दिले. तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी सात दिवसात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देशदेखील दिले.
------------------------------------------
कामे निकृष्ट दर्जाची
तुळई नळ पाणीपुरवठा योजनेचे विहीर खोदकाम अपूर्ण आहे. तसेच टाकीचे बांधकाम अर्धवट असून, पॉवर हाउस, गावातील जलवाहिनीचे काम पूर्ण केलेले नाही. तसेच मुख्य वाहिनी, जलशुद्धीकरणाची यंत्रणांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.