भिवंडी (वार्ताहर)ः शांती आणि अहिंसेचे उपासक जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त श्री समस्त जैन महासंघाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत जैन साधू साध्वी व विविध जैन पाठशाळा मधील २४ चित्ररथ सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक नजराणा कंपाउंड येथून सुरू झालेली शोभायात्रा मंडई, नविचाळ, गौरीपाडा, नारपोली, धामणकर नाका मार्गे अंजूरफाटा येथील जैन मंदिरात रथयात्रेचा समारोप झाला. भिवंडी शहरात एकूण १८ जैन मंदिरांच्या एकत्रित जैन महासंघावतीने आयोजित या रथयात्रेत स्त्री पुरुष युवक युवती लहान बालक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी भगवान महावीर यांच्या मूर्तीसोबत पर्यावरण रक्षण, पशुप्रेम यावरील देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.