मुंबई

डोंबिवलीत गतिमंद महिलेवर अत्याचार

CD

डोंबिवलीत गतिमंद महिलेवर अत्याचार
रिक्षाचालकाला अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : डोंबिवली पूर्वेतील एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी रिक्षाचालक फैजल खान (वय २१) याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत तत्काळ बुधवारी (ता. ९) रात्री त्याला ताब्यात घेत अटक केली. गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

डोंबिवलीत एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही गतीमंद महिला आपल्या नातेवाइकांकडे जात होती. या वेळी रिक्षाचालकाने तिला अज्ञात ठिकाणी नेऊन अमानुष कृत्य केले. या गतिमंद महिलेने घडलेला प्रकार सोमवारी (ता. ७) आपल्या आईला सांगितला. यानंतर बुधवारी (ता. ९) पीडितेच्या आईने टिळकनगर पोलिस ठाणे गाठत मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे व तांत्रिक बाबी तपासून पोलिसांनी रिक्षाचालक फैजल याला बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता १४ एप्रिलपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay India : मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

Akola: दारु दुकानाला NOC देण्यासाठी मागितले १ लाख, तडजोडीनंतर ६० हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह लिपीकाला अटक

पेट्रोल- डिझेल नंतर आता सोनेही महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Wardha News: बदलीसाठी २० हजारांची मागणी; वर्धेच्या वरिष्ठ लिपीकावर एसीबीची कारवाई

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT