पनवेल, ता. १० (बातमीदार) : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात नुकताच आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकशाही दिन पार पडला.
नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवाद वाढीसाठी महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी (ता. ७) नागरी सेवा-सुविधांबाबत समस्या सोडविण्यात आल्या. या लोकशाही दिनी दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. मागील लोकशाही दिनी प्राप्त झालेल्या १० तक्रारींचे निवारण झाले आहे. या वेळी उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, सहायक संचालक नगररचना केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक नीलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सामान्य प्रशासन विभागप्रमुख दशरथ भंडारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.