अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः तालुक्यातील चेंढरे येथील शासकीय निवासी इमारतींचे पुनर्बांधणी करण्यात येत आहे, मात्र निधीअभावी हे काम रखडले आहे. निधी मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने निवासी इमारतींचे बांधकाम रखडले आहे.
अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथे असणाऱ्या शाासकीय वसाहतीतील इमारती अत्यंत धोकादायक झाल्या आहेत. अनेक वेळी इमारतींचे स्लॅब पडून किरकोळ अपघात घडले आहेत. त्यामुळे इमारतींचे २०२२ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. इमारती धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आल्याने इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सादर करण्यात आला. धोकादायक असल्याने रहिवाशी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. मात्र पुनर्बांधणीला अद्याप मंजुरी न मिळाल्याने वसाहतीचे रूपांतर खंडरमध्ये झाले असून झाडेझुडपे वाढली आहे. या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनैतिक धंदे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
निधीसाठी पाठपुरावा
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांच्याकडे विचारणा केली असता, इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करून यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुनर्प्रस्तावही धूळ खात
शासकीय निवासी इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निधी मिळावा, अशा मागणीचे पत्र अनुसूचित जाती मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष नीलेश महाडीक यांनी जून २०२३ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना सादर केले होते. यानंतर या इमारतींच्या बांधकामासाठी पुनर्प्रस्तावही पाठविण्यात आला. मात्र अद्यापही निधी मंजूर करण्यात आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.