मुंबई

सह्याद्री पर्वत रांगेत नव्या अप्रकाशित लेणीची भर

CD

बदलापूर, ता. १० (बातमीदार) : बुद्ध लेणी संवर्धन व संरक्षण चळवळीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याच्या बीड खुर्द येथे संशोधन रविवारी (ता. ६) करण्यात आले. याप्रसंगी येथील काही गावांच्या पाठीशी असलेल्या, सह्याद्री डोंगराच्या कुशीत बौद्ध धर्मीयातील भिक्खू संघाच्या निवासस्थानाचे अवशेष सापडले. या ठिकाणी बुद्ध लेणी संवर्धन आणि संरक्षण संस्थेच्या पदाधिकारी व सभासदांनी येथील या अवशेषांचे मोजमापही घेतले.
चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध लेणी संवर्धन आणि संरक्षण संघटनेच्या वतीने रविवारी श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील डोंगररांगांच्या कुशीत संशोधन सुरू होते. अशाच वेळी खालापूर तालुक्यातील बीड खुर्द या ठिकाणी शेकडो वर्षी जुनी भिक्खू निवासांचे अवशेष आढळून आले. या भिक्खू निवासाच्या दर्शनी भागाची उंची सहा फूट सहा इंच असून, रुंदी सात फूट पाच इंच आहे. भिक्खू निवासात कोरलेला बाक आढळला.

कोरलेली अक्षरे
निवासी अवशेषात धम्मलिपीतील शिलालेख कोरलेला आढळला. त्यात सह्याद्री पर्वत रांगेत अप्रकाशित लेणीची भर ‘म(लस)री गिरनं कोझकाने पूसादो’ अशी अक्षरे दिसतात. भिक्खू निवासाच्या उजव्या बाजूस नैसर्गिक गुहा असून, थोडेफार कोरीव काम केलेले आढळते. दुसऱ्या गुहेत एक व्यक्ती झोपू शकतो एवढी जागा आहे. त्यामध्ये ‘सिंहपभरो(क)’ असे पाच अक्षरे आढळून येतात.

श्रमदानातून रस्ता
आढळलेल्या या लेणीचे संवर्धन करण्यासाठी त्यासमोर दगड मातीची भर टाकून बसण्याकरिता जागा करण्यात आली आहे. लेणीवर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे अवघड ठिकाणी रस्ता बनवण्यात आला. श्रमदान मोहिमेत संस्थेचे सदस्य राकेश गायकवाड, प्रभाकर जोगदंड, आनंद खरात, आतिश ढोणे यांच्यासह जवळपास ४५ लेणी संवर्धकांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT