मुंबई

भारताला ‘सायलेंट एपिडेमिक’चा धोका

CD

भारताला ‘सायलेंट एपिडेमिक’चा धोका
‘हेल्थ ऑफ द नेशन २०२५’च्या अहवालात धक्कादायक माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : अपोलो इकोसिस्टीमने केलेल्या २.५ दशलक्षपेक्षा अधिक व्यक्तींच्या तपासणी अहवालांवरून भारताला ‘सायलेंट एपिडेमिक’चा धोका असल्याचे समोर आले आहे. अपोलोने ‘हेल्थ ऑफ द नेशन २०२५’ अहवालाची पाचवी आवृत्ती प्रकाशित केली.
फॅटी लिव्हर आजार, रजोनिवृत्तीनंतर आरोग्यामध्ये होणारी घसरण आणि लहान वयातील स्थूलपणा या तीन आरोग्य आव्हानांकडे हा अहवाल लक्ष वेधतो. २६ टक्‍के व्यक्तींना हायपरटेन्शन तर २३ टक्‍के व्यक्तींना मधुमेह असल्याचे समजले, पण त्यांना कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नव्हती.
अपोलो रुग्णालयातील नोंदींनुसार प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०१९मध्ये आरोग्य तपासणी एक दशलक्ष, २०२४ मध्ये २.५ दशलक्षपेक्षा अधिक म्हणजे गेल्या पाच वर्षांत १५० टक्‍के वाढ झाली आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य देखभालीच्या बाबतीत सार्वजनिक जागरूकता वाढली. तसेच स्वतः पुढाकार घेण्याचा कल वाढत असल्याचे यावरून स्‍पष्‍ट हाेते. या अहवालातील निष्कर्ष हे अपोलोचे सर्व रुग्‍णालय, क्लिनिक्स, प्रयोगशाळा तसेच एआयवर आधारित रिस्क स्ट्रॅटिफिकेशन यावरून काढली आहे.

भारतातील नवीन मेटाबोलिक सिग्नल
फॅटी लिव्हर हा आजार लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाशी संबंधित एक महत्त्वाचा आरोग्य मुद्दा म्हणून समोर येत आहे. तपासणी केलेल्या दोन लाख ५७ हजार १९९ व्यक्तींपैकी ६५ टक्‍के व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर होते. त्यापैकी ८५ टक्‍के अल्कोहोल न घेणारे होते.

महिलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण
रजोनिवृत्तीनंतर महिलांसाठी आरोग्य धोक्यांमध्ये खूप जास्त वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. रजोनिवृत्तीपूर्वी मधुमेहाचे प्रमाण १४ टक्‍क्‍यांवरून रजोनिवृत्तीनंतर ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. तर लठ्ठपणा ७६ टक्‍क्‍यांवरून ८६ टक्‍क्‍यांपर्यंत वेगाने वाढला आहे. फॅटी लिव्हरचा प्रसार ५४ टक्‍क्‍यांवरून ७० टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. हे महत्त्वाचे बदल महिलांच्या दीर्घकालीन आरोग्यावर हार्मोनल बदलांचा खोलवर परिणाम दर्शवतात. रजोनिवृत्ती जवळ येत असताना महिलांसाठी सक्रिय, वैयक्तिकृत आरोग्य धोरणांची आवश्यकता दाखवतात.

लठ्ठपणामध्ये वाढ
प्राथमिक शाळांतील ८ टक्‍के विद्यार्थी आधीच जास्त वजनाचे किंवा लठ्ठ होते.किशोरावस्थेमध्ये हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये २८ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. जीवनशैली आणि आहारातील बदलांचा परिणाम गंभीर असल्याचे यावरून दिसते. याव्यतिरिक्त १९ टक्‍के महाविद्यालयीन विद्यार्थी प्री-हायपरटेन्सिव्ह असल्याचे आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

T20 WC : टीम इंडियाने अहमदाबाद येथे खरंच 'हॉटेल' बदललं होतं का? कर्णधार Suryakumar Yadav म्हणाला, कोणीतरी आम्हाला सांगितलं...

पेट्रोल-डिझेलचा साठा किती? इंडियन ऑइलने इंधन टंचाईच्या प्रश्नावर दिलं स्पष्टीकरण

Meta Anti-Scam Tool: WhatsApp-Facebook वर स्कॅमर्सची खैर नाही! मेटाचे नवे अ‍ॅण्टी-स्कॅम टूल्स लॉन्च, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका

Circuit Bench Kolhapur : सर्कीट बेंचचे पोलिस अधीक्षक, बार असोसिएशनवर कडक शब्दात ताशेरे, महिला वकिल मारहाण प्रकरण

SCROLL FOR NEXT