उचेडे येथे हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार
पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण तालुक्यातील उचेडे गावातील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात नव्या हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या वेळी मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. सलग चार दिवस येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, सायंकाळी सहा ते सात वाजता येेथे हरिपाठ, अंबिका भजन मंडळ यांचे संगीत भजन तसेच हनुमान मूर्तीची स्थापना कलश, ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सत्कार समारंभ आणि सायंकाळी महिलांचा हळदी-कुंकू समारंभ तसेच सावरसई (हेटवणे) यांचे हरिपाठ हभप गणपत महाराज हिलम यांचे कीर्तन होणार आहे. तर १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त हभप केशव महाराज कांदळे यांचे कीर्तन होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
....................
सुभानराव राणे पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
अलिबाग (वार्ताहर) ः श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या अवधूत संप्रदायाचे बीजारोपण रायगड जिल्ह्यात करणारे गुरुवर्य सुभानराव राणे यांच्या ४३व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन प्रतिष्ठानतर्फे गुरुवर्य सुभानराव राणे पेझारी येथील श्रीदत्त मंदिरात बुधवारी ता. १६ रोजी करण्यात आले आहे. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत. यामध्ये श्रींची पूजा, अभिषेक, दत्तात्रेय सहस्रनामावली, ध्वजारोहण, महाआरती, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गुरुवर्य सुभानराव राणे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर, गंधर्व कोळी, मीनल पाटील, अशोकबुवा पाटील, अरुणबुवा कारेकर यांचे भजन व महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर दुपारी श्रीपंत बोधपीठअंतर्गत डाॅ. संजय भगत यांचे कीर्तन व विविध पंतभक्तांची भजने होणार आहेत. या वेळी खासदार अरविंद सावंत, माजी आमदार पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील, भावना पाटील, चित्रा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, आंबेपूर सरपंच सुमना पाटील यांच्यासह संजीव पंतबाळेकुंद्री, रंजन पंतबाळेकुंद्री, राजीव पंतबाळेकुंद्री, डाॅ. संजय पंतबाळेकुंद्री, अभिजित पंतबाळेकुंद्री, शंकरराव म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
.....................
वरदायिनी देवी प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात
तळा (बातमीदार) ः तळा तालुक्यातील महागावातील वरदायिनी देवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त मंगळवार, ८ ते १२ एप्रिल रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वेदमूर्ती धनंजय शास्त्री निलखे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंडित सुमित शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी देवी-देवता कलश मिरवणूक, बुधवार (ता. ९) गणेशपूजन पुण्याहवाचन मातृका स्थापनानिमित्त आरती, प्रवचन, दीपोत्सव, महाप्रसाद तर गुरुवार (ता. १०) प्राणप्रतिष्ठापना कलश रोहन बलिदान शुक्रवार (ता. ११) वरदायिनी देवीच्या जत्रेच्या काठीचे बारपे, महुरे, किस्तकेतके, निगुडशेत गावांकडे प्रस्थान, शनिवार (ता. १२) जत्रेच्या काठीचे आदिवासीवाडी महागाव मंदिराकडे प्रस्थान व नंतर जत्रोत्सव असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थमंडळ महागाव, विनवली, बहुलेवाडी व आदिवासीवाडी, मुंबईकर मंडळ, महिला मंडळ यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.