मुंबई

कोपरखैरणेत भरदिवसा ३० लाखांची घरफोडी

CD

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : कोपरखैरणेतील बोनकोडे भागात राहणाऱ्या एका सोनाराचे घर अज्ञात चोरांनी भरदिवसा फोडून त्यांच्या घरातील पाच लाखांच्या रोख रकमेसह वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने असा तब्बल ३० लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ७ एप्रिलला उघडकीस आली आहे. कोपरखैरणे पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार मांगिलाल कुमावत (५१) हे सोनार असून, ते कोपरखैरणेतील बोनकोडे येथील गोकुळधाम अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहण्यास आहेत. मांगिलाल यांच्या आईची तब्येत खराब असल्याने ते काही दिवसांपूर्वी आपल्या मूळगावी राजस्थान येथे गेले होते. त्यामुळे त्यांचा मुलगा आणि मुलगी हे दोघेच घरी हेते. ७ एप्रिलला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा व मुलगी हे दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते. यादरम्यान, मांगिलाल यांचे घर बंद असल्याने चोरांनी संधी साधून त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. मांगिलाल यांच्या घरातील कपाटात पाच लाख रुपयांची रोख रक्कम, तसेच ६०४.८१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा तब्बल २९ लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. काही वेळानंतर मांगिलाल यांचा मुलगा व मुलगी हे दोघेही रात्री सव्वाआठ वाजता घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेची माहिती त्यांनी वडील मांगिलाल यांना दिल्यानंतर बुधवारी त्यांनी राजस्थान येथून नवी मुंबई गाठून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT