मुंबई

वादग्रस्त रस्त्याचे काम अखेर रद्द

CD

भाईंदर, ता. १० (बातमीदार): मिरा-भाईंदर महापालिका बांधणार असलेल्या मिरा रोड येथील वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रस्त्याचे प्रस्तावित काम रद्द करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामावरून वाद निर्माण झाला होता. रस्त्याच्या कामामुळे झाडे तोडावी लागणार होती, तसेच एका विकसकाच्या फायद्यासाठी रस्ता बांधला जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

मिरा रोड येथील उद्यानाचे आरक्षण असलेल्या जागेत तरण तलाव बांधण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता. या तरण तलावाभोवती नऊ मीटर रुंद रस्त्याचे बांधकाम केले जाणार होते, मात्र रस्त्याच्या कामामुळे २० झाडांचा बळी दिला जाणार होता. झाडे तोडण्याची नोटीस महापालिकेकडून जाहीर होताच पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी झाडे तोडायला विरोध केला, तर दुसरीकडे हा रस्ता एका खासगी विकसकाला फायदा मिळवून देण्यासाठी बांधला जात असल्याचाही आरोप होऊ लागला. अखेर महापालिका प्रशासनाने रस्त्याचे कामच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या विशेष निधीतून या ठिकाणी तरण तलाव बांधण्यात येणार होता, मात्र तरण तलावाचे काम अन्यत्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिणामी या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या तरण तलावाचे काम यापूर्वीच रद्द करण्यात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्ता बांधण्याची व झाडे काढण्याची आवश्यकताच उरलेली नाही, असे प्रसिद्धिपत्रक मिरा-भाईंदर महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांनी काढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT