मुंबई

गायमुखची कचरामुक्ती लांबणीवर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० ः गायमुखवरील कचऱ्याला आग लागल्याने मंगळवारी रात्री ठाणेकरांची धुराने घुसमट झाली होती. त्यामुळे ठाणे महापालिकेने गायमुख येथील कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे, पण सीपी तलाव सकंलन केंद्रावरील कचरा उपसण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने गायमुखवरील कचरा उचलण्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
कचरा कोंडीने ठाणेकरांच्या नाकीनऊ आले असून, ठाणे पालिका प्रशासनही सर्व आघाड्यांवर झुंजत आहे. एकीकडे ठाणेकरांचा संताप, तर दुसरीकडे राजकारण्यांच्या असहकार्यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न अधिक किल्ष्ट झाला आहे. सीपी तलाव, मुल्ला बाग, गायमुख येथील कचरा संकलन केंद्रांना विरोध वाढला आहे. त्यापैकी सीपी तलाव संकलन केंद्रातील कचऱ्याला दोन वेळा आग लागली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातच कचऱ्याचा प्रश्न चिघळल्याने पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर येथील कचरा उपसण्यास सुरुवात केली, मात्र १५ दिवसांपासून उपसा सुरू असूनही कचऱ्याचे डोंगर हटत नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, गायमुखच्या वनक्षेत्रातील कचराभूमीला आधीपासूनच लोकप्रतिनिधी तसेच पर्यावरणप्रेमींचा विरोध होता. अशातच येथील कचऱ्याला मंगळवारी रात्री आग लागल्याने हा परिसर कचरामुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे, पण सीपी तलाव येथील कचरा हटवल्यानंतरच गायमुख येथील कचरा हटवला जाणार असल्याने विलंब होण्याची शक्यता आहे.
------------------------------------------------
धुराचे लोट रस्त्यावर
गायमुख येथील कचराभूमीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात ठाणे पालिकेच्या अग्निशमन दलाला जरी यश आले असले तरी संपूर्ण परिसरात धुराची चादर परसलेली आहे. दोन दिवसांपासून कचऱ्याला लागलेल्या आगीतून येणारा धूर थांबलेला नाही. त्यामुळे दुर्गंधीबरोबर आता धुराचे लोट महामार्गावरही आला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-------------------------------------------------
विल्हेवाट प्रकल्पाची प्रतीक्षा
गायमुख येथे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असले तरी प्रकल्प सुरू होण्यास साधारण एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT