‘दशपदी’ करणार विश्वविक्रम
प्रयोगाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये होणार नोंद
डोंबिवली, ता. १० : केशवसुत, मर्ढेकर, कुसुमाग्रज, अनिल, रेगे, ग्रेस, विंदा अशा एकाहून एक श्रेष्ठ मराठी कवींच्या कवितांना आधुनिक दृक-श्राव्य स्वरूपात रंगतदार संवादाची जोड देण्यात आली आहे.
डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची संकल्पना व निर्मिती असलेल्या ‘दशपदी’मध्ये मराठी कवितांचे आशयनुरूप दृक-श्राव्य सादरीकरण आहे. जगातील कोणत्याही भाषेत प्रथमच अशी संकल्पना म्हणून हा मान डॉ. क्षितिज यांची व सोबत त्यांचा सहकारी व अभिनेता प्रसन्न माळी यांना मिळाला आहे. या दृक-श्राव्य सादरीकरणात ३० व्यक्तिरेखा साकार केल्याबद्दल एकत्रित विश्वविक्रमी नोंद केली जात आहे. या विश्वविक्रमाची नोंद रविवारी (ता. १३) वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये होणार आहे.
डोंबिवलीतील फडके रोड येथील गणपती मंदिरात रविवारी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा व दशपदीचा प्रयोग पार पडत आहे. डोंबिवलीमधील सुप्रसिद्ध पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या फ्रेंड्स कट्टाअंतर्गत या प्रयोगाचे अजेय संस्थेच्या संयोगाने आयोजन होत आहे. हा प्रयोग विनामूल्य असून, आपल्या भाषेत होत असलेल्या या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मराठी काव्यप्रेमी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
क्षितिज कुलकर्णी व प्रसन्न माळी एकत्र हा कार्यक्रम सर्वत्र सादर करतात. अजेय स्टुडिओजद्वारा गौरव संभूस या युवा निर्मात्याने दशपदीची निर्मिती केली आहे. शाळा, विविध साहित्य संस्था इथे या प्रयोगाला पसंती मिळत आहे. अधिक माहितीसाठी ९९३०१७५५२७ / ८४५१९६२०९३ / ९७०२१४७२७६ या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.