मुंबई

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची तक्रार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० ः राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला तरी त्यांची बदली करण्यात आलेली नाही. वर्षानुवर्षे ठाणे महापालिकेत ठाण मांडलेल्या अशा अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांशी आर्थिक जवळीक वाढलेल्या अशा अधिकाऱ्यांची अडचण होण्याची शक्यता आहे.
शासन नियमांनुसार कोणताही प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्याची तीन वर्षांनंतर बदली करणे बंधनकारक आहे. ठाणे महापालिकेतही प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आहेत. त्यापैकी मुख्य लेखापाल यांचा तीन वर्षांचा कालावधी केव्हाच संपला आहे. नगर अभियंत्यांनाही पदभार स्वीकारून तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. उपायुक्त असलेले एक अधिकारी आता अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार नसल्याचे समजते, मात्र उर्वरित प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची बदली होणे अपेक्षित असताना होत असलेल्या दिरंगाईमुळे पालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर तसेच निर्णय प्रक्रियेवर शंका निर्माण होत असल्याचे काँग्रेस पदाधिकारी राजेश जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.
-------------------------------------------------
कार्यवाही होण्याची अपेक्षा
राजेश जाधव यांनी पत्रात कोणत्या अधिकाऱ्यांची नावे घेतली नसली तरी त्यांचा रोख मुख्य लेखापालांकडे असल्याची चर्चा आहे. राजेश जाधव यांनी आपल्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून, याप्रकरणी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या मागणीची सकारात्मक दखल घेऊन तत्काळ कार्यवाही होईल, अशी अपेक्षा पत्रातून व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT