मुंबई

कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

CD

तारापूर, ता. १० (बातमीदार) : रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेचा कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बोईसरमध्ये घडली. या अपघातप्रकरणी कारचालक डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तारापूरजवळील घिवली येथे राहणारे विश्वनाथ आरेकर हे आपल्या पत्नीसमवेत बुधवारी (ता. ९) सकाळी तारापूर अणू विद्युत प्रकल्पाच्या रहिवासी संकुलात असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आले होते. छायालता आरेकर (वय ७३) या रुग्णालय इमारतीच्या बाहेर पडून रस्ता पार करीत असताना एका कारने त्यांना समोरून जोरदार धडक देत जवळपास १० ते १२ फूट अंतरापर्यंत फरपटत नेले. या अपघातात छायालता या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने अणुऊर्जा प्रकल्पाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या अपघातप्रकरणी कारचालक डॉ. आर. के. दास याला तारापूर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक निवास कणसे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT