मुंबई

खोदून ठेवलेल्या चेंबरमुळे अपघाताचा धोका

CD

खोदून ठेवलेल्या चेंबरमुळे अपघाताचा धोका
उरण, ता. १० (वार्ताहर) ः उरण शहरातील रहदारीच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून चेंबरच्या दुरुस्तीच्या खोदकाम करून ठेवले आहे. या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध केलेल्या खोदकामाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण नगरपालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांना समस्यांनी ग्रासले आहे. कचरा समस्या, वाहतूक कोंडी तर पाण्याच्या अशा विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी पाण्याचा चेंबरचे खोदकाम दुरुस्तीच्या नावाखाली केले होते. सद्यःस्‍थितीत हे चेंबर असेच पडून आहे. त्याचा त्रास नागरिकांसह वाहनचालकांना होत आहे. शिवाय हे चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघाताचा धोकादेखील वाढला आहे. हा रस्‍ता रहदारीचा असल्याने चेंबरमुळे वाहतूक कोंडीदेखील होते. त्‍यामुळे नगर पालिका प्रशासनाने या चेंबरचे काम लवकरात
लवकर करून तो बुजविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT