मुंबई

पोषण आहाराचा भार

CD

शहापूर, ता.१० (वार्ताहर) : उन्हाचा तडाखा वाढल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वर्गखोल्या थंड ठेवा, प्रथमोपचार आणि पेयजलाची व्यवस्था करा; पोषण आहारात सरबत, ताक, ओआरएसचे पाकीट देण्याची सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहापूर तालुक्यातील शाळांना दिल्या आहेत. पण त्यासाठी लागणाऱ्या पैशांबाबत स्पष्टता नसल्याने मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात, मात्र त्यासाठी पुरेसा निधी वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत आता वाढत्या उन्हामुळे मुलांना ताक, सरबत, ओआरएसचे पाकीट देण्याची सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर उन्हाची तीव्रता पाहता शाळेच्या वेळा सकाळी कराव्यात, उन्हामुळे दुपारच्या सत्रात खेळाचे तास नको, असे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. पण सरबत, ताकासाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न आता शिक्षकांना सतावत आहे. महत्त्वाचे म्हणजे शालेय साहित्य खरेदीसाठी लहान शाळांना ५,०००, तर मोठ्या शाळांना १२ हजार ५०० रुपये शाळा संयुक्त अनुदान मिळते. मात्र अजूनही ते मिळालेले नाही. त्यामुळे एकीकडे पोषण आहाराचे किंवा शाळांना साहित्य खरेदीसाठी मिळणारे अनुदान वेळेत मिळत नसताना आता नवीन आदेशामुळे सरबत, ताक खरेदीसाठी पैसे आणायचे कुठून, असा सवाल शिक्षक संघटनांकडून विचारला जात आहे.
--------------------------------------------------------
शिक्षकांची तारांबळ उडणार
- शाळेत मिळणाऱ्या पोषण आहाराचे अनुदान वेळेवर मिळत नाही. अजूनही अनुदान शाळांकडे आलेले नाही. बऱ्याच शाळांमध्ये तांदूळदेखील वेळेवर नसतात. अनुदान वेळेत नसतानाही शिक्षक, मुख्याध्यापकांना हा खर्च करावा लागतो. एखाद्या शाळेत २५ ते ३० मुले असतील त्यांना एकाच वेळा हा खर्च करणे शक्य होईल. परंतु शंभर, दोनशे, अडीचशे विद्यार्थी असलेल्या शाळांनी एवढा खर्च कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- उन्हाचा तडाखा लक्षात घेता एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात परीक्षा घेणे सोईस्कर होते. मात्र शासनाने पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा आता २५ एप्रिलपर्यंत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत पेपर तपासून १ मे रोजी निकाल घोषित करावा लागणार असल्याने शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.
--------------------------------------------------
उन्हाची तीव्रता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत दिलेल्या सूचनेप्रमाणे ताक, सरबत, ओआरएसची व्यवस्था शाळा पातळीवर करण्यास सांगितले आहे. आर्थिक तरतुदीअभावी या निर्णयाची अंमलबजावणी शाळा पातळीवर कशी करणार, हा आमच्यापुढे प्रश्न आहे.
- विनोद लुटे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT