मुंबई

टेम्पो-दुचाकींचा भीषण अपघात

CD

टेम्पो-दुचाकींचा भीषण अपघात
चार जण गंभीर जखमी; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

पोलादपूर, ता. १० (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईकडून पोलादपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोची ठोकर दुचाकीला बसल्याने दुचाकीवरील चालक व सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ९) रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, दुचाकीस्वाराचा माणगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमींना मुंबईला हलविण्यात आले आहे.
हा अपघात लोहारमाळ गावच्या हद्दीत झाला. फिर्यादी गणेश महादेव येरुणकर (वय ४१, रा. पोलादपूर) यांचा भाचा सुनील सुरेश पवार दुचाकीवरून पत्नी व दोन मुलांना घेऊन जात होते. त्या वेळी टेम्पोचालक अतुल अजित कातवणकर (वय ३५, रा. मिठबाग, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने मार्गस्थ करीत पुढे जाणाऱ्या दुचाकीला डाव्या बाजूने ओव्हरटेक करीत असताना ठोकर बसली. या अपघातात सुनील पवार (वय ४१), सुवर्णा सुनील पवार (वय ३९), श्लोक सुनील पवार (वय १३), रिया सुनील पवार (वय १०) असे चार जण जखमी झाले. या सर्वांना सर्वप्रथम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र सुनील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. आरोपी अतुल अजित कातवणकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT